Ad will apear here
Next
‘सुरतवाला कुटुंबाची संघर्षगाथा’ पुस्तकाचे प्रकाशन
‘सुरतवाला कुटुंबाची संघर्षगाथा’ पुस्तकाचे प्रकाशन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते झाले. या वेळी लेखक सुरेशचंद्र सुरतवाला, चंपकलाल सुरतवाला  आदी मान्यवर उपस्थित होते.
पुणे : बाबासाहेब पुरंदरे यांनी उलगडून दाखवलेली ‘सुरतेची स्वारी’, स्वारी दरम्यान शिवाजी महाराजांनी घेतलेल्या सर्वधर्मीय काळजीचे प्रसंग, आई वडलांची काळजी घेत चला, वाचन करा, शिक्षणाशिवाय सारेच व्यर्थ आहे, असा बाबासाहेबांनी दिलेला संदेश आणि महाराष्ट्र गुजरात यांच्यात जिव्हाळ्याचे संबंध राहावेत, असे केलेलं आवाहन यामुळे ‘सुरतवाला कुटुंबाची संघर्षगाथा’ पुस्तक प्रकाशन समारंभ आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती वितरण समारंभ संस्मरणीय ठरला.

सुरतवाला फाउंडेशनच्यावतीने रसिक मित्र मंडळचे अध्यक्ष सुरेशचंद्र सुरतवाला लिखित ‘सुरतवाला कुटुंबाची संघर्षगाथा’ पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आणि गुणवंत विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी सायंकाळी करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंपकलाल सुरतवाला होते. सुरेशचंद्र सुरतवाला यांनी त्यांच्या आई-वडिलांची कथा ‘सुरतवाला कुटुंबाची संघर्षगाथा’ या पुस्तकाद्वारे मांडली आहे. 

या कार्यक्रमादरम्यान ‘रंगीलदास सुरतवाला चॅरिटेबल ट्रस्ट’ व ‘सुरतवाला फाउंडेशन’तर्फे चार लाख रुपयांची शिष्यवृत्तीचे वाटप होणार करण्यात आले. ही शिष्यवृत्ती शहरी आणि ग्रामीण भागातील महाविद्यालयीन विद्यार्थीनींना मिळून, त्यांच्या उच्च शिक्षणाकरीता देण्यात येते. या उपक्रमाचे ४ थे वर्ष होते . 

या वेळी नटवरलाल सुरतवाला, बळवंत जमनादास गांधी, माजी महापौर शांतीलाल बाबुभाई सुरतवाला, दिनेश हरिलाल सुरतवाला, जतीन धनसुखलाल सुरतवाला, जगमोहन रंगीलदास सुरतवाला (रंगीलदास सुरतवाला चॅरिटेबल ट्रस्ट), रमेश गोविंद वैद्य उपस्थित होते 

बाबासाहेब पुरंदरे म्हणाले, ‘आई वडिलांच्या प्रति असलेल्या जिव्हाळ्याचे दर्शन या पुस्तकातून झाले आहे . विद्यार्थ्यांनी हे पुस्तक वाचलेच पाहिजे. आई वडिलांप्रती आदर दाखवणे अत्यंत महत्वाचे आहे. सुरतवाला कुटुंबाचे पुण्यात योगदान आहे. शिकणाऱ्यांना मदत करण्याचा हा उपक्रम अत्यंत महत्वपूर्ण आहे . शिवाजी महाराजांच्या वकील मंडळात दोन गुजराती होते. तेव्हापासून महाराष्ट्राचे -गुजरातचे नाते जिव्हाळ्याचे होते . महाराजांनी सुरत लुटली कारण औरंगजेबाने स्वराज्याची लूट केली होती.ते सुरत लुटण्याकरिता लुटायला गेले नव्हते तर स्वराज्याला औरंगजेबापासून झालेल्या नुकसानीची भरपाई मागायला गेले होते. त्यांचा सरदार उर्मटपणे लागल्याने त्यांना सुरत लुटणे भाग पडले. या लुटीच्या बातम्या इंग्रजी,फ्रेंच वर्तमानपत्रात आल्या. इंग्रजी कारभाऱ्यानी सुरत लुटीच्या दरम्यान शिवाजी महाराजांनी धर्मस्थळांच्या दाखवलेल्या काळजीचे आणि संरक्षणाचे वर्णन केले आहे.हे करताना त्यांनी महिला, धर्मस्थळे यांची काळजी घेतली . महाराष्ट्र आणि गुजरात यांच्यात जिव्हाळ्याचे संबंध राहिले पाहिजेत. आपण एक आहोत ही भावना वृद्धिंगत केली पाहिजे’. 

शांतीलाल सुरतवाला, सुरेशचंद्र सुरतवाला यांनी मनोगत व्यक्त केले. प्रदीप निफाडकर यांनी सूत्रसंचालन केले. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VZQWBJ
Similar Posts
वैद्य खडीवाले यांच्या पुस्तकांचे शनिवारी प्रकाशन पुणे : वैद्य प. य. वैद्य खडीवाले लिखित आणि डायमंड पब्लिकेशन प्रकाशित ‘आयुर्वेदीय वनौषधी’ (सचित्र वनस्पतींची उपयुक्तता), ‘सहजसोपे घरगुती आयुर्वेदीय उपचार’ आणि ‘एटूझेड आरोग्यवर्धिनी’ या तीन पुस्तकांचे प्रकाशन व वैद्य खडीवाले यांचे सर्वांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. शनिवारी , ९
‘राजेंद्र कृष्ण यांनी सर्व ‘मूड्स’ना गीतातून सजवले’ पुणे : ‘हिंदी गीतकार राजेंद्र कृष्ण यांनी जीवनातील सर्व भावभावना, ‘मूडस्’नुसार उत्कट गीतलेखन केले, त्यामुळे त्यांची गीते सजली आणि लोकप्रिय ठरली,’ असे उद्गार हिंदी भाषेच्या अभ्यासक प्रा. शलाका गोळे यांनी काढले.
‘पारंपरिक जावळी : अर्थ आणि विवेचन’ या पुस्तकाचे प्रकाशन पुणे : नृत्य क्षेत्रातील विद्वान आणि साहित्यिक डॉ.पप्पु वेणुगोपाल राव लिखित ‘बंच ऑफ जावळीज्’ या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद नृत्य कलाकार आणि ब्लॉगर स्वरदा ढेकणे हिने केला आहे. या ‘पारंपरिक जावळी : अर्थ आणि विवेचन’ या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी, २८ जुलै रोजी ज्येष्ठ भरतनाट्यम् नृत्यांगना डॉ. स्वाती
डॉ. कल्याणी हर्डीकर यांचे व्याख्यान पुणे : ‘रसिक मित्र मंडळातर्फे कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या कवितांवर डॉ. कल्याणी हर्डीकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. ‘एक कवी-एक भाषा’ या व्याख्यानमालेअंतर्गत हे व्याख्यान २३ नोव्हेंबर २०१८ रोजी शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता पुणे श्रमिक पत्रकार संघ सभागृह येथे होणार आहे,’ अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष सुरेशचंद्र सुरतवाला यांनी दिली

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language